शेतीमधील नवीन वाट, गवतापासून सीएनजी गॅसची निर्मिती

पारंपारिक नगदी पिकांना पर्याय ठरणार सेंद्रिय खत आणि सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती ही नेपिअर ग्रास या गवतापासून केली जाणार आहे. यामुळे परिसरातील ऊस आणि सोयाबीन शेतीच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचे उत्पादन पर्याय ठरू शकते.

    लातूर- जिल्ह्यातल्या शिरूर-अनंतपाळ येथे सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस ( CNG gas) निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी ( Maharashtra rural farmers) अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या गवतापासून ( CNG from grass) सीएनजी – पीएनजी गॅस आणि सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्यसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी दिली. शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीने हा प्रकल्प उभा करण्यासाठी म्हणून दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची सभासद म्हणून नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासची लागवड करायला प्रोत्साहन देऊन त्याची खरेदी केली जाणार आहे.

    पारंपारिक नगदी पिकांना पर्याय ठरणार

    सेंद्रिय खत आणि सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती ही नेपिअर ग्रास या गवतापासून केली जाणार आहे. यामुळे परिसरातील ऊस आणि सोयाबीन शेतीच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचे उत्पादन पर्याय ठरू शकते.

    प्रकल्प उभारण्यासाठी 60 कोटींचा खर्च

    नेपिअर गवतापासून सेंद्रिय खत आणि सीएनजी, पीएनजी गॅस निर्मितासाठी मोठा खर्च येणार आहे. साधरणतः हा प्रकल्प उभा करण्यासाठी 60 कोटींचा खर्च येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला उभा करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांनी सभासद म्हणून नोंदणी केली आहे, असं शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी सांगितलं.

    ग्रामीण भागाला काय फायदा?

    नेपिअर सुपर ग्रासचे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल. नेपिअर ग्रास शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांना यासाठी एका टनाला 1 हजार भाव दिला जाईल. शेतकऱ्यांना एकरी वार्षिक 1 ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न होईल. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली दिसेल, असे मत दत्ता शिवणे यांनी व्यक्त केले.

    शेतकऱ्यांनी काय करायचे?

    शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचे सभासदत्व स्वीकारलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचे बियाणे देण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करायची. नेपिअर ग्रासची कापणी करुन कंपनीला दिले जाईल. कंपनी त्यावर प्रक्रिया करेल आणि त्यापासून सेंद्रिय खत, सीएनजी आणि पीएनजी गॅसची निर्मिती होईल.

    New avenues in agriculture, production of CNG gas from grass..