अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

    मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

    सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.

    दरम्यान, मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर MHT-CET परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने विद्यार्थी अडकून पडले. नांदेड विभागातही अनेक विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यात आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी-सीईटीचे परीक्षा सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार होते. पण पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहोचता आले नव्हते.