राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौ-यात राजशिष्टाचाराची ऐशीतैशी

राज्यपालांनी आज नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेट दिली. यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार वसतीगृहाचे उदघाटन करण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे राज्य सरकारच्या नाराजी नंतर राज्यपालांनी दौरा रद्द केला नसला तरी ते काहीसे वरमले असल्याचे मानले जात आहे.

  महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीचा ठराव मंजूर करून कळविल्यानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांच्या नांदेड Nanded, हिंगोली Hingoli, परभणी Parbhani या जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दौ-याला आज सुरूवात झाली. नांदेड येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौ-यात शासनाचे अधिकारी उपस्थित असले तरी राजशिष्टाचारानुसार पालकमंत्र्यानी स्वागताला हजर राहणे आवश्यक असूनही तिनही जिल्हयात पालकमंत्र्यानी राज्यपालांच्या दौ-यावर बहिष्कार टाकला.

  उद्घाटन टाळले राज्यपाल वरमले?

  राज्यपालांनी आज नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध उपक्रमास भेट दिली. यावेळी कोश्यारी यांनी विद्यापीठांच्या रेनहाँर्वेस्टिंग, स्टार्ट अप उपक्रमांच कौतूक करत विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार वसतीगृहाचे उदघाटन करण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे राज्य सरकारच्या नाराजी नंतर राज्यपालांनी दौरा रद्द केला नसला तरी ते काहीसे वरमले असल्याचे मानले जात आहे.

  ‘राजनीती मै नही आप कर रहे है’

  दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नांदेडमध्ये पत्रकारांनी “दौऱ्यावरुन राजकारण होतंय का?” असा प्रश्न विचारला असता ‘राजनीती मै नही आप कर रहे है’ असे म्हणत माध्यमेच राजकारण करत असून आपण काही करत नसल्याचे सांगीतले. राज्यपालांच्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर राज्य मंत्रिमंडळाने तीव्र आक्षेप घेतला होता. त्याबाबत मुख्य सचिवांमार्फत राजभवनला कळवण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली होती.

  पालकमंत्र्याचा बहिष्कार

  मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाला. त्यामुळे राज्यपालांच्या या दौऱ्यात नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक Nawab Malik हे उपस्थित राहिले नसून राजशिष्टाचाराच्या संकेतानुसार त्यांचे स्वागत करण्यात आले नाही. तरीही राज्यपालांनी नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे कार्यक्रम कायम ठेवले आहेत. राजभवनाकडून जारी करण्यात आलेल्या राज्यपालांच्या सुधारित कार्यक्रम पत्रिकेत राज्यपाल तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.