ravsaheb danwe

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या डीएनडी सीमेवर घडला होता. पोलिसांच्या धक्काबुक्कीत राहुल गांधी खाली पडले. यावर भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी असंवेदनशील टीका केल्याचे समोर आले आहे. राहुले यांना धक्काबुक्की झाली नाही, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले असे दानवे म्हणले.

  • या आधीही बऱ्याचदा केले वादग्रस्त वक्तव्य
  • केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मराठवाडा दौऱ्यावर
  • हाथरस प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही

लातूर.  हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या डीएनडी सीमेवर घडला होता. पोलिसांच्या धक्काबुक्कीत राहुल गांधी खाली पडले. यावर भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी असंवेदनशील टीका केल्याचे समोर आले आहे. राहुले यांना धक्काबुक्की झाली नाही, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले असे दानवे म्हणले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नसल्यामुळे ते पडले असावेत. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झाले असावे.” विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधीही या आधीही बरेचदा रावसाहेब दानवे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले आहेत.

हाथरस प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही

“हाथरस प्रकरणात चौकशी सुरू आहे. जर आवश्यकता पडल्यास सीबीआय चौकशी करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. याप्रकरणातील कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही,” असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

“हाथरस प्रकरणातील चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून मीडियाला थांबवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी परवानगी देण्यात आली,” मीडियाच्या प्रवेशबंदीवर रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मराठवाडा दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उस्मानाबाद आणि लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी विधायक कसे चांगले आहे याबाबत त्यांनी सरकार तर्फे आपले मत मांडले. त्यांचे निवेदन संपल्यानंतर पत्रकारांनी हाथरसमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले.