aurangabad kanase

आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव काकासाहेब कणसे असे आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस होते. काकसाहेब कणसे यांच्यावर पैठण तालुक्यातील धानगाव येथे घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना २१ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा  (Corona) संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनावर बालकांपासून ते वयोवृद्ध रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु काही रुग्णांनी कोरोनाच्या धास्तीने आपले जीवन (suicide) संपवले आहे. असाच प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या शासकीय सुपरस्पशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं उडी मारुन (commits suicide) आत्महत्या केली आहे.

या आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव काकासाहेब कणसे असे आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तालुका सरचिटणीस होते. काकसाहेब कणसे यांच्यावर पैठण तालुक्यातील धानगाव येथे घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना २१ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु २५ सप्टेंबरला प्रकृती खालवल्यामुळे आयसीयुमध्ये हलवण्यात आले.


परंतु रविवारी सकाळी डॉक्टरांचा राऊंड सुरु असताना त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिलं. त्यानंतर त्यांनी शौचास जाण्याचा बहाण्यानं इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. संबंधित प्रकार वॉर्डातील ब्रदरच्या लक्षात आला. त्यानं खिडकीतून डोकाऊन पाहिले असता कणसे खाली पडलेले दिसले. लगेचच त्यांना अतिविशेषोपचापर इमारतीतील आरएमओ व खालील सुरक्षा रक्षकांना सुचित करण्यात आलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकासाहेब कणसे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र कोरोनाच्या धास्तीनं त्यांनी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. तसेच नातेवाईकांकडे चौकशी करत आहे.