Mumbai: Drugs party on a cruise; Shah Rukh's son's night in jail

शाहरुख खान आणि गौरी खानला आर्यन खानच्या अटकेमुळे(Aryan Khan Drugs Case) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्यनला एनसीबीने क्रुझ ड्रग्ज प्रकरणी पकडले होते. त्यानंतर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याला पुन्हा अटकेत राहावे लागले होते. शाहरुख सध्या मुलाला सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसून येत आहे.

  मुंबई : शाहरुख खान आणि गौरी खानला आर्यन खानच्या अटकेमुळे(Aryan Khan Drugs Case) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्यनला एनसीबीने क्रुझ ड्रग्ज प्रकरणी पकडले होते. त्यानंतर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याला पुन्हा अटकेत राहावे लागले होते. शाहरुख सध्या मुलाला सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसून येत आहे.

  प्रकरण इतके दिवस चालेल याचा अंदाज नव्हता, असा खुलासा खान कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे. सतीश मानेशिंदे या वकिलांसोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी आर्यनला लवरकात लवकर सोडवू, असा विश्वास दिला होता. पण तसे काहीच न झाल्याने आर्यनच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

  एड. सतीश मानेशिंदेंना केसवरून हटवणार

  क्रूझ रेव्ह ड्र्ग्ज पार्टीप्रकरणी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आर्यन आर्थर रोड तुरुंगात दिवस मोजत आहे. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दोन वेळा आर्यनला जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेला कोर्टाने जामिन अर्ज फेटाळला. यामुळे हवालदिल झालेल्या शाहरुखने आता वकीलच बदलण्याचा निर्णय घेतला असून आर्यनची केस आता वकील अमित देसाई लढणार असल्याची चर्चा आहे.

  अमित देसाई नवे वकिल

  अमित देसाई हे गुन्हे प्रकरण हाताळणारे वकील आहेत. सतीश मानेशिंदे यांच्यासारखेच ते निष्णांत वकील असून दबंग सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात देसाई यांनीच जामिन मिळवून दिला होता. आर्यनच्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. देसाई यांनी आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा मुद्दा लावून धरला होता. तसेच आर्यनला व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असल्याने त्याला लवकरात लवकर जामिन देण्यात यावा अशी विनंती देसाई यांनी कोर्टाला केली होती. पण कोर्टाने देसाई यांचा जामिन फेटाळून लावला होता. यामुळे बुधवारी कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

  शाहरुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात

  सुत्रांच्या माहितीनुसार, आर्यन खानसोबत शाहरुख आणि गौरीचा काहीही संपर्क होऊ शकत नाही आहे. पण शाहरुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आर्यनच्या तब्येतीची चौकशी करत करत असतो.