1 crore 18 lakh drugs seized from 75-year-old grandmother; Major action of Bandra Crime Branch

मुंबई पोलिसांच्या वांद्रे क्राईम ब्रान्चने चिंचवाडी परिसरातून अमली पदार्थाची मोठी खेप पकडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख रुपयांची ३ किलो ९६० ग्रॅम चरस जप्त केली आहे. मुंबईत चरसच्या तस्करीत कोण-काेण सक्रिय आहेे? या चरसची खेप कोठून आणण्यात आली होती, याची चौकशी पोलीस करत आहेत.

    मुंबई : मुंबई पोलिसांच्या वांद्रे क्राईम ब्रान्चने चिंचवाडी परिसरातून अमली पदार्थाची मोठी खेप पकडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख रुपयांची ३ किलो ९६० ग्रॅम चरस जप्त केली आहे. मुंबईत चरसच्या तस्करीत कोण-काेण सक्रिय आहेे? या चरसची खेप कोठून आणण्यात आली होती, याची चौकशी पोलीस करत आहेत.

    क्राईम ब्रान्च युनिट ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम, चिंचवाडी स्थित फिल्डर रोडवर साने गुरजी सेवामंडळाजवळ चरसची मोठी खेप येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बाडगे, सुनयना सोनावणे, उप निरीक्षक धेत्रे आणि परबलकर यांच्या पथकाने सापळा रचून एका संशयित ७५ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता तिच्याकडून ३ लाख ९६० ग्रॅम चरस जप्त झाली. त्याची सुमारे १ कोटी १८ लाख इतकी किंमत आहे.

    महिलेचे नाव जोहराबी शेख असे आहे. तिची चौकशी केल्यानंतर आणखी एक आरोपरी किशोर गवळी (५७) यालाही अटक केली. किशोर गवळी महिलेसोबत मिळून चरसची खरेदी-विक्री करायचा. दोघांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध कलमान्वये अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ मे पर्यंत पोलीस काेठडी सुनावली आहे.