मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, १ ठार २ जखमी

  • मुंबई- अहमदाबाद माहामार्गावर खानिवडे टोल नाक्याच्या जवळील ब्रीजवर ट्रक पंक्चर काढण्यासाठी थांबला. मागुन येणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात बसली की, पंक्चर काढण्यासाठी जॅक वर उभं केलेल्या ट्रक जॅक वरुन पुढे गेला

मुंबई – मुंबई- अहमदाबाद महामार्गावर २ ट्र आणि १ चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात चाराचकी मारुती गाडी आणि ट्रकच्या समोरच्या भागाचा चक्काचुर झाला आहे. अहमदाबाद महामार्ग टोल नाक्याजळील ब्रीजवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 

काय आहे प्रकार 

मुंबई- अहमदाबाद माहामार्गावर खानिवडे टोल नाक्याच्या जवळील ब्रीजवर ट्रक पंक्चर काढण्यासाठी थांबला. मागुन येणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात बसली की, पंक्चर काढण्यासाठी जॅक वर उभं केलेल्या ट्रक जॅक वरुन पुढे गेला आणि समोरुन येणाऱ्या चारचाकीला धडका, गाडीतील ड्रायव्हर बाचावला आहे. परंतु पंक्च काढण्यासाठी ट्रकपुढे झोपलेला ड्रायव्हरचा अंगावरुन चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी २ जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. पंक्चर झालेल्या ट्रकमधील केबीन मध्ये एक जण आडकला होता. त्याला स्थानिकांनी बाहेर काढले आहे.