१ रुपयांच्या नोटमुळे तुम्हीही बनू शकता श्रीमंत, कोणत्या नोटांना मागणी ; जाणून घ्या कसे?

अनेक ऑनलाईन वेबसाईटवर लक्झरी नंबरच्या नोट या महागड्या किंमतीत विकल्या जातात. यात 888888 किंवा 123456 असे सिरीअल नंबरच्या नोटींचा समावेश असू शकतो. यासोबतच बराच काळापूर्वीच्या जुन्या नोटाही लोक खरेदी करतात. काही लोक ठराविक राज्यपालांच्या सहीमुळे त्याची किंमत वाढू शकते. तर काहीजण स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

  मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या पॉकेट, पर्स किंवा कपाटात 1 किंवा 2 रुपयांची जुनी नोट असते. अनेकजण ही नोट कधीही खर्च करत नाही. या जुन्या नोट चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजण शौक म्हणून ही नोट आपल्या पॉकेटमध्ये ठेवतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑनलाईन वेबसाईटवर खूप जुन्या आणि लक्झरी नंबरच्या नोटा विकल्या जात आहेत. ज्या लोकांना नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा अत्यंत महागड्या किंमतीत विकत घेत आहेत.

  त्यामुळे जर तुमच्याकडे असलेली जुनी नोट ही एखाद्या विशिष्ट नंबरची असेल तर ती तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. तसेच जर तुम्हाला नोट खरेदी करायची असल्यास ती कशी खरेदी करता येईल? यासाठी कसे पैसे आकारले जातील, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  कोणत्या नोटांना मागणी?

  अनेक ऑनलाईन वेबसाईटवर लक्झरी नंबरच्या नोट या महागड्या किंमतीत विकल्या जातात. यात 888888 किंवा 123456 असे सिरीअल नंबरच्या नोटींचा समावेश असू शकतो. यासोबतच बराच काळापूर्वीच्या जुन्या नोटाही लोक खरेदी करतात. काही लोक ठराविक राज्यपालांच्या सहीमुळे त्याची किंमत वाढू शकते. तर काहीजण स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

  आपण श्रीमंत कसे होऊ शकता?

  जर तुमच्याकडेही एक रुपयाची फार जुनी नोट असेल, ती लोकांना आवडेल, ती फार जुन्या काळातली असेल किंवा त्यामागे काही विशेष कथा असेल तर ती नोट सहज खरेदी केली जाते. यासाठी तुम्हाला या नोटेचा फोटो Ebay सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करा. यानंतर Ebay तुम्हाला लिलावाचा पर्याय देते. त्याद्वारे तुम्ही त्याचे मूल्य ठरवून त्याचा लिलाव करु शकता आणि ती नोट तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.