वैद्यकीय अहवालावर बोगस सही प्रकरणी १० तक्रारी; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

राज्यात वैद्यकीय अहवालावर बोगस सही प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडे १० तक्रारी करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. यातील काही डॉक्टरांवर कारवाई तर उर्वरित डॉक्टरांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

  • ८ डॉक्टरांवर कारवाई तर दोघांची चौकशी

मुंबई (Mumbai).  राज्यात वैद्यकीय अहवालावर बोगस सही प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडे १० तक्रारी करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. यातील काही डॉक्टरांवर कारवाई तर उर्वरित डॉक्टरांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात रोग निदान प्रयोग शाळा सुरु करण्यासाठी स्पष्ट नियमावली नसल्यामुळे मागील काही महिण्यापासून राज्यभर अनेक अनधिकृत रोगनिदान प्रयोगशाळा सुरु आहेत. तसेच राज्यात रोग निदान प्रयोगशाळेत सुरु करण्याबाबतची नियमावली तयार करण्याबाबतचा प्रश्न आमदार अतुल भातखळकर, श्रीनिवास वनगा यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवाय वैद्यकीय तपासणी केलेल्या अहवालांवर प्रत्यक्ष पाहणी न करता एम डी पॅथॉलॉजिस्ट स्वाक्षरी करण्याऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली का असे विचारण्यात आले.

यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले कि ,बोगस सह्यांच्या बाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडे १० तक्रारी करण्यात आल्या. यातील आठ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. तर दोन डॉक्टरांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.