शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक ; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

सर्व अकृषी विद्यीपाठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधील शिक्षक (Teachers) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य (100% attendance of teachers) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षा (Final Year Exam) घेण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी आता सर्व अकृषी विद्यीपाठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधील शिक्षक (Teachers) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य (100% attendance of teachers) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून शुक्रवारी तसा आदेश जारी करण्यात आला आहे.

सदर परीक्षेच्या कामकाजाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रतलित कार्यपद्धतीनुसार परीक्षा पद्धतीमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश असून त्यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे, अशी अनेक कामे समाविष्ट आहेत. तसेच सदर परीक्षा १ ऑक्टोंबर ते ३१ आक्टोंबर २०२० या कालावधीत घेऊन त्यांचा निकाल नोव्हेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणे. याकरिता मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

एकंदरीत कमी कालावधीत परीक्षा पार पाडणे आणि निकाल घोषित करणे हे आव्हानात्मक काम पार पाडण्यासाठी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने म्हटले आहे.