100 कोटी वसुली प्रकरण : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लीनचिट ?

देशमुखांच्या वसुली प्रकरणाची CBI कडून प्राथमिक चौकशी पुर्ण झाली आहे. या चौकशीअंती अऩिल देखमुख यांच्या विरोधात एकही पुरावा नाही. देशमुखांच्या विरोधात एकही पुरावा नसल्याने त्यांच्यावरील 100 कोटी रूपये वसूलीचे आरोप सिद्ध होत नाहीत. म्हणून देशमुखांची चौकशी थांबवावी, असं या अहवालात नमूद करण्यात आलं  आहे.

    100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ED आणि CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अऩिल देशमुख यांना क्लीनचिक दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे तपासाधिकारी उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी याबाबतचा 65 पानी अहवाल वरिष्ठांना सादर केला असून त्यात ‘अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणताही पुरावा नमिळाल्याने त्यांची चौकशी थांबवावी’ असं म्हटलं आहे.

    देशमुखांच्या वसुली प्रकरणाची CBI कडून प्राथमिक चौकशी पुर्ण झाली आहे. या चौकशीअंती अऩिल देखमुख यांच्या विरोधात एकही पुरावा नाही. देशमुखांच्या विरोधात एकही पुरावा नसल्याने त्यांच्यावरील 100 कोटी रूपये वसूलीचे आरोप सिद्ध होत नाहीत. म्हणून देशमुखांची चौकशी थांबवावी, असं या अहवालात नमूद करण्यात आलं  आहे.

    CBI चं झालं आता ED चं बाकी

    अनिल देशमुख यांना CBI ने क्लीनचिट दिली असली तरी देशमुखांमागची ED ची पीडा अजून सुटलेली नाही. देशमुखांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले असून ते आतापर्यंत एकदाही ED च्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. देशमुख यांनी वकील इंदरपाल सिंग यांच्यामार्फत आपलं स्टेटमेंट पाठवलं आहे.

    दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदी असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली केली होती. बदली झाल्यानंतर सिंग यांनी ‘गृहमंत्री अनिल देशमुखा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते.’ अशा गंभीर आरोप केला. आणि त्यामुळेच सध्या देशमुख यांची अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआय कडून चौकशी सुरू आहे.