100 कोटी वसुली प्रकरण: मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना सीबीआयने पाठवलेल्या समन्स विरोधात राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(sitaram kunte) व राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे(Sanjay Pandey) यांना सीबीआयने समन्स बजावल्या नंतर त्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याबाबतच्या याचिकेवर २० ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे.

    मुंबई: राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(sitaram kunte) व राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे(Sanjay Pandey) यांना सीबीआयने समन्स बजावल्या नंतर त्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याबाबतच्या याचिकेवर २० ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे.

    100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआयचा तपास

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केंद्रीय तपास यंत्रणाना दिलेल्या जबाबानंतर सीबीआयने २१ एप्रिल रोजी देशमुख व अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुकांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाही सीबीआयच्या तपासात समाविष्ट आहे. त्यासंदर्भात माजी गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालाची प्रत व कागदपत्रे न्यायालयातील अर्जानंतर राज्य सरकारने सीबीआयला दिली.

    बदल्यांच्या घोटाळा अहवाल प्रकरणी समन्स

    त्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सीबीआय तपास करत असून गृह विभागाच्या उपसचिवांची चौकशी सीबी आयने नुकतीच केली आहे. त्यानंतर कुंटे व पांडे यांना समन्स बजावल्याचे सांगण्यात येत आहे. या राज्य सरकारने याचिकेद्वारे सीबीआयच्या समन्सना आव्हान दिले आहे.