100 कोटींचे वसुली प्रकरण; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कोणत्याही क्षणी अटक करणार?

शनिवारी ईडीने तिसऱ्यांदा देशमुख यांना समन्स पाठवून 5 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. तथापि यावेळीही देशमुख ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता कमी आहे. कोणतेतरी नवे कारण पुढे करून ते ईडीसमक्ष उपस्थित राहण्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यांना अटकेची भीतीही वाटू लागली आहे. ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशलाही 6 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे.

  मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. ईडीच्या पथकांनी मुंबईसह महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत देशमुखांना अटक करण्यासाठी जाळे पसरविले आहे. देशमुख सध्या दिल्लीत असल्याचे समजते. ईडीने 25 जून रोजी नागपूर आणि मुंबईत देशमुख यांच्या निवासस्थानांसह पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या दोन सचिवांना ईडीने अटकही केली होती.

  मुलगा ऋषिकेशला समन्स

  शनिवारी ईडीने तिसऱ्यांदा देशमुख यांना समन्स पाठवून 5 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. तथापि यावेळीही देशमुख ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता कमी आहे. कोणतेतरी नवे कारण पुढे करून ते ईडीसमक्ष उपस्थित राहण्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यांना अटकेची भीतीही वाटू लागली आहे. ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशलाही 6 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे.

  कंपनी व ट्रस्टमध्ये वसुलीची रक्कम

  • ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेचा पैसा खासगी सचिव पलांडे व सहायक सचिव शिंदेंकडे पोहोचता केला जात होता.
  • त्यानंतर ही रक्कम विविध कंपन्यांद्वारे ऋषिकेशच्या कंपन्या व ट्रस्टमध्ये वळती करण्यात येत होती.
  • बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टीच्या माध्यमातून 4.70 कोटींची वसुली झाली होती आणि ही रक्कम याच वर्षी देशमुखांचा खासगी सहायक शिंदेंकडे सोपविली होती, असा जबाब वाझेने ईडीला दिला आहे.