पैसे दुपटीचा कमालीचा फॉर्म्युला; क्षणार्धात१००चे २०० रुपये कसे केले पाहा VIDEO

सध्या नोटांचा रंग वेगवेगळा आहे. रंगांनी नोट ओळखली जाते. १०० रुपयांची नोट जांभळ्या रंगाची, २०० रुपयांची नोट पिवळ्या रंगाची, २००० रुपयांची नोट गुलाबी रंगाची आहे आणि नोटांना दिल्या जाणाऱ्या रंगावरूनच या व्यक्तीने आपलं डोकं चालवलं. त्याने १०० रुपयांची एक नोट घेतली आणि त्यावर हळद टाकून पिवळी २०० रुपयांची नोट बनवली. काय मग आहे की नाही जादू?

    मुंबई : आपल्याकडे असलेले पैसे दुप्पट (Double money) करण्यासाठी बहुतेकांची धडपड सुरू असते. काही ठिकाणी पैसे गुंतवून अगदी कमीत कमी वेळेत जास्त पैसे (Money) कमवण्याकडे लोकांचा कल असतो. सध्या पैसे दुपटीचा असाच एक मजेशीर (Funny Video) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने घरबसल्या काही सेकंदाचत पैसे दुप्पट करून दाखवले आहेत.

    सोशल मीडियावर व्यक्तीने १०० रुपयांची नोट २०० रुपयांच्या नोटेत बदलून दाखवली आहे. तेसुद्धा फक्त काही सेकंदात.

    सध्या नोटांचा रंग वेगवेगळा आहे. रंगांनी नोट ओळखली जाते. १०० रुपयांची नोट जांभळ्या रंगाची, २०० रुपयांची नोट पिवळ्या रंगाची, २००० रुपयांची नोट गुलाबी रंगाची आहे आणि नोटांना दिल्या जाणाऱ्या रंगावरूनच या व्यक्तीने आपलं डोकं चालवलं. त्याने १०० रुपयांची एक नोट घेतली आणि त्यावर हळद टाकून पिवळी २०० रुपयांची नोट बनवली. काय मग आहे की नाही जादू? पैसे दुप्पट करण्याचा कमालीचा फॉर्म्युला. हा व्हिडिओ मजेशीर आहे. पण या व्यक्तीच्या टॅलेंटला मात्र दाद द्यायला हवी.

    आतापर्यंत पैशांसोबत केलेले तुम्ही असे बरेच जादूचे व्हिडिओ पाहिले असतील. पण असा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला असेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया येत आहे.

    100 rupees currency note man converting into 200 rupee weird trick funny video viral