मुंबईतील १०० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

घाटकोपर : घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातून १०० वर्ष वय असलेले एक आजोबा कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. विक्रोळी पार्क साईटच्या वर्षा नगर मध्ये साईनाथ नगर सोसायटी मध्ये ते त्यांच्या

घाटकोपर : घाटकोपरमधील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातून १०० वर्ष वय असलेले एक आजोबा कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. विक्रोळी पार्क साईटच्या वर्षा नगर मध्ये साईनाथ नगर सोसायटी मध्ये ते त्यांच्या कुटुंबासोबत राहातात. २१ मे ला त्यांना कोरोनाची लागण झाल्याने राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. २५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर आज त्यांना कोरोनामुक्त झाल्यनंतर डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचारी व स्थानिक रहिवासी यांच्याकडून फुलांचा वर्षांव करून १०० वर्षीय आजोबांचे स्वागत करण्यात आले.