राज्यात १०,१०७ नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ८२१ रुग्णांची नोंद

बुधवारी राज्यात १०,१०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,३४,८८० झाली आहे. आज १०,५६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,७९,७४६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,३६,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : बुधवारी राज्यात १०,१०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,३४,८८० झाली आहे. आज १०,५६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,७९,७४६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,३६,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात बुधवारी २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २३७ मृत्यूंपैकी १४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर काल अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ९९९ ने वाढली आहे.

    हे ९९९ मृत्यू, नाशिक-२४०, पुणे-१३५, अहमदनगर-१२९, नागपूर-९४, सातारा-८१, ठाणे-४९, सांगली-२८, लातूर-२४, जळगाव-२३, बीड-२२, कोल्हापूर-२२, रत्नागिरी-१९, नांदेड-१७, परभणी-१५, औरंगाबाद-१४, भंडारा-१४, हिंगोली-११, अकोला-९, बुलढाणा-८, पालघर-८, रायगड-८, वाशिम-८, चंद्रपूर-७, उस्मानाबाद-६, नंदूरबार-३, वर्धा-२, गडचिरोली-१, जालना-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८६,४१,६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,३४,८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,७८,७८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ८२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१७१७२ एवढी झाली आहे. तर ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५२२७ मृत्यूची नोंद करण्यात आली.