मुंबईत कोरोनाचे १०१५ नवे रुग्ण ; मंगळवारी ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी १०१५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार ८७८ वर पोहचली आहे.मंगळवारी रुग्णसंख्येत घट ज़ालेली दिसून आली, जून च्या सुरुवातीपासून रुग्ण संख्या दिवसे दिवस

मुंबई : मुंबईमध्ये  मंगळवारी १०१५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार ८७८ वर पोहचली आहे.मंगळवारी रुग्णसंख्येत घट ज़ालेली दिसून आली, जून च्या सुरुवातीपासून रुग्ण संख्या दिवसे दिवस वाढत होती, परंतु आज रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून  आली.

त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १७५८ वर पोहचला आहे.मुंबईमध्ये कोरोना रुग्ण संख्या पाहता, मंगळवारी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये  ४० पुरुष तर १८  महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. ३० जण हे ६० वर्षांवरील, तर २६ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ६९० संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार ७०३ वर पोहचली आहे. तसेच ९०४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २२  हजार ९४२ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.दरम्यान, १ जून ते ८ जून पर्यन्त मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ३% असल्याची माहिती देण्यात आली.