राज्यात १०,२१९ नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ७३० रूग्णांची नोंद

सोमवारी राज्यात १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,४२,००० झाली आहे. आज २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,६४,३४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,७४,३२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : सोमवारी राज्यात १०,२१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,४२,००० झाली आहे. आज २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,६४,३४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,७४,३२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे.

    हे १८६ मृत्यू, यवतमाळ-४९, पुणे-३५, कोल्हापूर-२५, नाशिक-१५, ठाणे-१४, अहमदनगर-११, अकोला-८, औरंगाबाद-७, उस्मानाबाद-५, सिंधुदुर्ग-५, चंद्रपूर-३, लातूर-२, रायगड-२, जालना-१, नागपूर-१, सांगली-१, सोलापूर-१ आणि पालघर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६६,९६,१३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,४२,००० (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

    सध्या राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबईत दिवसभरात ७३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७११३७३ एवढी झाली आहे. तर २८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४९९९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    हे सुद्धा वाचा