maharashtra corona cases

५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये ११०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १४ हजार २८७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६३५० वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये शुक्रवारी ११०० नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३६ पुरुष तर १७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४० जण हे ६० वर्षांवरील, तर १० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. 

मुंबईत कोरोनाचे ७८७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ८० हजार ७२६ वर पोहचली आहे. तसेच ६८९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८७ हजार ७४ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.