मुंबईत कोरोनाचे ११०९ नवे रुग्ण

मंगळवारी ४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई :मुंबईमध्ये मंगळवारी ११०९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ९८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने

मंगळवारी ४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी ११०९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ९८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६८ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, मंगळवारी कोरोना रुग्णांनी ४१ हजारांचा आकडा ओलांडला.

मुंबईमध्ये मंगळवारी ४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३४ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखाली आहे. २० जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ६८६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ४२५ वर पोहचली आहे. तसेच २२६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १७ हजार २१३ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.