Sharad Pawar

मुंबई. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी तयार असलेली उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कॅबिनेटद्वारे प्रस्ताव पारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी तीन पक्षांनी आपापल्या प्रत्येकी चार उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप दिले आहे.

मुंबई. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी तयार असलेली उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (12 candidates finalized by sharad pawar for state assembly election) कॅबिनेटद्वारे प्रस्ताव पारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी तीन पक्षांनी आपापल्या प्रत्येकी चार उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप दिले आहे. तथापि ही यादी राज्यपालांकडे सोपविण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचे किंगमेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ‘वर्षा’ निवासस्थानी जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा केली. या यादीवर पवारांनीही मोहोर उमटविली असल्याची माहिती सूत्राने दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोणत्याही नावात त्रुटी असू नये यासाठी या यादीत सहभागी नेत्यांच्या नावांची माहिती पवार यांना दिली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या १२ जागांवरील उमेदवारांची यादी मुख्यमंत्री ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोमवारी सोपविणार असल्याची चर्चा आहे. ज्यांचा संबंध साहित्य, विज्ञान, कला, सहकारी आंदोलन व समाजसेवेशी संबंधित आहे अशा व्यक्तींना राज्यपाल विधान परिषदेच्या या रिक्त जागांवर नियुक्त करतात.