आझाद मैदान एएनसीकडून १२ लाखांचे एमडी जप्त; सराईत एमडी तस्कर गजाआड…

मडीची तस्करी करणारा सराईत आरोपी मोहसिन कय्युम सय्यद (३५) याला सोमवारी गजाआड करण्यात आले. सदर कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आझाद मैदान अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केली. या कारवाईत सय्यद याच्याकडून १२ लाख रुपयांचे १०० ग्रॅम एमडी, पांढऱ्या रंगाचा इलेक्ट्रॉिनक वजन काटा जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

    मुंबई : एमडीची तस्करी करणारा सराईत आरोपी मोहसिन कय्युम सय्यद (३५) याला सोमवारी गजाआड करण्यात आले. सदर कारवाई मुंबई पोलीस दलाच्या आझाद मैदान अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केली. या कारवाईत सय्यद याच्याकडून १२ लाख रुपयांचे १०० ग्रॅम एमडी, पांढऱ्या रंगाचा इलेक्ट्रॉिनक वजन काटा जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

    हवालदार बनकरमुळे आरोपी जाळ्यात

    मुंबई शहाराभोवती पसरत असलेले अंमलीपदार्थांचे जाळे तोडण्याकरिता पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमलीपदार्थविरोधी विभागाची सर्व पथकांनी विशेष मोहीम राबवून तस्कऱ्यांचा शोध सुरू केला. शोधमोहीम सुरू असताना हवालदार बनकर यांना खबऱ्याने एमडी तस्कऱ्याची माहिती दिली. सदर मािहतीच्या आधारे आझाद मैदान एएनसी पथकाने गोवंडी पश्चिम परिसरातील ठक्कर ट्रेडिंग कंपनीच्या गेटजवळ सापळा लावून मोहसिन कय्युम सय्यद याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सय्यद हा एमडी तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, मोठे रॅकेट उजेडात आणण्याच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे तपास करत आहेत.

    या गुन्ह्याची उकल उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) पोलीस निरीक्षक संदीप काळे, आझाद मैदान एएनसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कदम, पोउपनि काळे, पोलीस अंमलदार मोरे, चव्हाण, आघाव, सिंह, हवालदार (चालक) जाधव, अंमलदार निंबाळकर आदी पथकाने केली.