राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार?, नवाब मलिक यांनी दिले उत्तर

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खोटी अफवा पसरवत आहेत. राष्ट्रवादीचे कोणताही आमदार भाजपच्या संपर्कात नाही आहे. असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई – राज्यात शिवसेन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात शासन करत आहे. हे तीन पक्षांची महाविकासआघाडी सत्तेत आल्यापासुन विरोधी भाजप सत्ता पाडण्याचे प्रयत्न करत आहे. भाजप पक्षात राष्ट्रवादीचे १२ आमदार प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते १२ आमदार कोण आहेत याबाबत राज्यात चर्चा सुरु आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या चर्चेला पुर्णविराम लावला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खोटी अफवा पसरवत आहेत. राष्ट्रवादीचे कोणताही आमदार भाजपच्या संपर्कात नाही आहे. असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. 

पुढे नवाब मलिक असेही म्हणाले की जे नेते विधानसभेच्या निवडकुीच्या आधी भाजपमध्ये सामील झाले आहेत. ते आता पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु त्या नेत्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. असे नवाब मलिक यांनी सांगतले आहे.