उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार; किरीट सोमय्यांचा थेट इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या मालमत्तांची पाहणी केली.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    दरम्यान आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या मालमत्तांची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला.

    सोमय्या नेमकं काय म्हणाले?

    सोन्या, चांदीची दुकाने, प्रथमेश पाईप फॅक्ट्री खरमाटे यांची आहे. प्रथमेश हे खरमाटे यांच्या मुलाचे नाव असून त्याच्या नावानं अनेक उद्योग आहेत. ही संपत्ती कुणाची आहे कळत नाही. अनिल परब यांच्या सचिवाची एवढई संपत्ती कशी? मग मंत्रिमहोदयांची किती असेल, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. दरम्यान, जरंग खरमाटे यांची तब्बल 750 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचा पगार 70 हजार आहे. मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, अशी विचारणा सोमय्या यांनी केली.