साकेत महाविद्यालयातील १२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तंबाखूमुक्तीची घेतली शपथ

कल्याण : कल्याण पूर्वतील साकेत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व नसबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधीदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये

कल्याण  : कल्याण  पूर्वतील साकेत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व नसबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधीदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये आँनलाईन माध्यमातून तांबाखू  दुष्परिणामाबद्दल जागृती करण्यात आली. झुम अँपच्या  माध्यमातून  सांकेत महाविद्यालयातील सुमारे १२०विद्यार्थ्यांनी आँनलाईन  सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रश्न मंजुषा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तंबाखू खाणार नाही,  अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी आँनलाईन माध्यमातून घेतली. रविवारी झालेल्या या  कार्यक्रमात  नशाबंदी मंडळांचे मुख्य संघटक  प्रा.अमोल मांडले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”तरुण वयात विद्यार्थी व्यसनाच्या विळख्यात अडकतात. आकर्षीत करणाऱ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यापासून सुटका करण्यासाठी मनाचा उत्तम ब्रेक विद्यार्थ्यांना लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

या कार्यक्रमाला साकेत ज्ञानपीठ संस्थचे सचिव,साकेत कुमार  सी.ई. ओ  शोभा नायर, साकेत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट निर्देशक सनोद कुमर प्रा बिजू प्रसिना,   निशा मॅडम, मिलींद पाटील नसबंदी मंडळाचे ठाणे, पालघर संघटक यांनी आँनलाईन सहभाग घेतला आँनलाईन  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा संजय चौधरी, प्रा.प्रिया नर्लेकर यांनी केले.