आता रस्त्यावर थुंकणे पडणार महागात, थेट १२०० रुपयांचा दंड, आयुक्तांची प्रस्तावाला मंजुरी

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आता यापुढे १२०० रुपये दंड लावायला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिलीय. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे केवळ कोरोनाच नव्हे, तर इतरही अनेक साथींच्या आजारांना निमंत्रण मिळत असतं. हे लक्षात घेऊन सध्याच्या कोरोना काळात पिचकारी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 

    सध्या कोरोनाची दुसरी लाट देशभरात धुमाकलू घालत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर थुंकणे हे कोरोनाला दिलेले निमंत्रण ठरते. रस्त्यावर थुंकल्यामुळे कोरोना अधिक वेगाने पसरत असल्याचे सिद्ध झाले आहे. हे रोखण्यासाठी सध्या मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना २०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मात्र आता ही रक्कम तब्बल  ६ पटींनी वाढवायला मुंबईच्या आयुक्तांनी परवानगी दिलीय.

    मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आता यापुढे १२०० रुपये दंड लावायला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिलीय. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे केवळ कोरोनाच नव्हे, तर इतरही अनेक साथींच्या आजारांना निमंत्रण मिळत असतं. हे लक्षात घेऊन सध्याच्या कोरोना काळात पिचकारी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

    मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा प्रस्ताव ठेवला होता. त्यात सध्याच्या २०० रुपयांवरून हा दंड १२०० रुपये करण्याची तरतूद करण्यात आलीय. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनं मंजुरी दिलीय.

    रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येते. गेल्या ७ महिन्यांत १४ हजारांपेक्षाही अधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. गेल्या ७ महिन्यांत मुंबई महापालिकेनं रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून २८ लाख ६७ हजार ९०० रुपये इतक्या दंडाची वसुली केलीय.

    रहिवाशांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, अशा सूचना महापालिकेच्या वतीनं करण्यात आल्यात.