राज्यात १२३० नवे रुग्ण, ३६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सोमवारी १२३० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची मृत्यूंची संख्या ८६८ झाली आहे. तसेच ५८७ रुग्ण बरे होऊन आतापर्यंत ४७८६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यात झालेल्या ३६ मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. मृतांमध्ये २३ पुरुष तर १३ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,१८,९१४ नमुन्यांपैकी १,९३,४५७. जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३,४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १२५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,०२७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५३.७१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात २,४८,३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,१९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.