मुंबईत कोरोनाचे १२६९ नवे रुग्ण

११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी १२६९नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार ०६८ वर पोहचली आहे.त्याचप्रमाणे ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा

११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू


मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी १२६९नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार ०६८ वर पोहचली आहे.त्याचप्रमाणे ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३४२३वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये गुरुवारी ११४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ७९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ७८  पुरुष तर ३६ महिलांचा समावेश आहे.

मृतांमधील ९ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ५५  जण हे ६० वर्षांवरील, तर ५९ जण हे ४० ते ६०  वर्षादरम्यान होते.११४ मॄत्यु पैकी ५५ मॄत्यु १६ ते १८ जून दरम्यानचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली, आणि बाकीचे ५९ मॄत्यु १५ जून पूर्वीचे होते.

मुंबईत कोरोनाचे ७९१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजार ३३९ वर पोहचली आहे. तसेच ४०१  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३२ हजार २५७ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.