मुंबईत कोरोनाचे १२९८ नवे रुग्ण

६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई :मुंबईमध्ये गुरुवारी १२९८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६२ हजार ७९९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा

६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू


मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी १२९८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६२ हजार ७९९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३३०९ वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये गुरुवारी ६७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४६ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ७ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३२ जण हे ६० वर्षांवरील, तर २८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८१७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजार ५४८ वर पोहचली आहे. तसेच ५१८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३१ हजार ८५६ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.