पूनावालांच्या कंपनीचे 13 कोटी जप्त; सेबीची कारवाई

सीरमचे अदर पूनावाला यांच्या नियंत्रणाखालील एका कंपनीवर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) कारवाई करीत 13 कोटी रुपये जप्त केले असून व्वयस्थापकीय संचालकांसह 8 जणांवर व्यवसाय करण्यासही बंदी घातली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये इनसाइडर ट्रेडिंगसाठी या युनिट्सवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

    मुंबई : सीरमचे अदर पूनावाला यांच्या नियंत्रणाखालील एका कंपनीवर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) कारवाई करीत 13 कोटी रुपये जप्त केले असून व्वयस्थापकीय संचालकांसह 8 जणांवर व्यवसाय करण्यासही बंदी घातली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये इनसाइडर ट्रेडिंगसाठी या युनिट्सवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

    पूर्वी या कंपनीचे नाव मॅग्मा फिनकॉर्प होते. 2021 मध्ये पूनावाला समूहच्या राइझिंग सन होल्डिंग प्रायव्हेट लि. द्वारे मॅग्मा कॉर्पमध्ये कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहणदेखील जाहीर करण्यात आले होते. सेबीने कारवाई करीत पूनावाली फीनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भूतडा यांच्यासह सौमिल शहा, सुरभी किशोर शहा, अमित अग्रवाल, मुरलीधर अग्रवाल, राकेश राजेंद्र भोजगढिया, राकेश राजेंद्र भोजगढिया एचयूएफ आणि अभिजित पवार यांच्यावर निर्बंध लादले आहेत.

    पूनावाला-नियंत्रित राइझिंग सन होल्डिंग्ज नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने मॅग्मा फिनकॉर्पमध्ये 60 टक्के हिस्सा खरेदी केला होता. पूनावाला यांना या कंपनीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले होते.