संकल्प सहनिवास संकुलात १३३ जणांनी केले रक्तदान

तरुण व तरुणींचा रक्तदानकरीता मोठा सहभाग मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सहनिवास संकुलात सोशल डिस्टंन्सिंगचे

तरुण व तरुणींचा रक्तदानकरीता मोठा सहभाग 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सहनिवास संकुलात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात संकुलातील १३३ जणांनी रक्तदान केले. 

संपुर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजाराशी लढताना आपल्या राज्यातील विविध रुग्णांलयांमधील रक्तपेढींमध्ये रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. दरदिवशी वाढणार्‍या कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता राज्यात केवळ काहीच दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. पुढील काळात रक्ताची भासणारी आवश्यकता लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देश तसेच राज्याच्या प्रमुखांनी वेळोवेळी सामाजिक कार्यासाठी केलेल्या आवाहनाला संकल्प सहनिवास संकुलाच्या संकल्प फेडरल सोसायटी आणि त्याच्या संलग्न संस्था असलेल्या संकल्प सांस्कृतिक मंडळ, संकल्प युवा, संकल्प महिला मंडळ यांनी रहिवाशांच्या सहकार्यानी नेहमीत सामजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

कोरोना बरोबरच विविध रुग्णालयांमध्ये विविध आजारांवर उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार संकल्प फेडरल सोसायटी व त्यांच्या संलग्नीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायटेक ब्लड बँक’ च्या मदतीने शनिवारी संकुलातील सांस्कृतिक केंद्रात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

या शिबीरात सुमारे १३३ जणांनी रक्तदान केले. यात वयाचे १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण व तरुणींनीही रक्तदान केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना ‘हायटेक ब्लड बँक’ कडून प्रमाणपत्रही देण्यात आले. या अगोदरही जानेवारीत माघी गणेश महोत्सवातही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १०० बाटल्या रक्त जमा करण्यात आले होते. शनिवारी पार पडलेल्या रक्तदान शिबीराचे नियोजन फेडरल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत माने, उपाध्यक्ष विवेक माळवी, सचिव प्रदीप केदारे, खजिनदार सुबोध महाडीक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड, उपाध्यक्ष धनंजय पानबुडे, सचिव अजय पवार, खजिनदार शैलेश शिरवाडकर तसेच अजय दुर्वास, हनुमंत सुळे, सचिन सावंत, दिलीप मोहीते, प्रदीप सावळ, प्रवीण पाटील, अरुण साटम व शिवाजी चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.