135 boats hit by Trans Harbor Link; Review by MMRDA Commissioner

एमएमआरडीएच्या देखरेखीखाली देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम सुरू आहे. चक्रीवादळामुळे हे काम थांबवले होते. दरम्यान, आता अर्धनिर्माण पुलाला देखील चक्रीवादळाचा फटका बसलीा आहे. एमटीएचएलच्या टेम्परेरी ब्रिजला सुमारे १३५ बोटींची धडक बसली. समुद्रात मच्छिमारांच्या अनियंत्रित झालेल्या बोटी पुलाच्या बांधकामस्थळी धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.

    मुंबई : एमएमआरडीएच्या देखरेखीखाली देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम सुरू आहे. चक्रीवादळामुळे हे काम थांबवले होते. दरम्यान, आता अर्धनिर्माण पुलाला देखील चक्रीवादळाचा फटका बसलीा आहे. एमटीएचएलच्या टेम्परेरी ब्रिजला सुमारे १३५ बोटींची धडक बसली. समुद्रात मच्छिमारांच्या अनियंत्रित झालेल्या बोटी पुलाच्या बांधकामस्थळी धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.

    ट्रान्स हार्बर लिंक पुलासाठी साहित्य आदींची ने-आण करण्यासाठी शिवडीकडे तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावर मजुरांसाठी तात्पुरते शौचालय, पाण्याची टाकी, घर इत्यादी तयार केले आहे. परंतु, वादळामुळे तात्पुरत्या स्वरुपात तयार बांधलेले बांधकाम उद्ध्वस्त झाले आहे.

    एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांिगतले की, एमटीएचएल कार्यस्थळाचा पाहणी दौरा केला तसेच नुकसानीचा आढावा घेतला. राजीव यांच्यामते, पुलाच्या बांधकामाला काही धोका पोहचला नाही, केवळ तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पुलाचा काही भाग नुकसानग्रस्त झाला. वादळामुळे काही बोटी १० कि.मी अंतरावरून वेगाने वाहत आल्या आणि येथील पुलाला थडकल्या.

    कोरोनाचा कामावर परिणाम

    कोरोनामुळे एमटीएचएलचे काम बाधित झाले आहे. त्यात वादळामुळेही काम बंद होते. या पुलाचा १६.५ कि.मी. लांबीचा मार्ग हा समुद्रातून जातो. दरम्यान, या पुलाची क्षमता १०० वर्षे टिकण्याची आहे. या मुलासाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा उपयोग होत आहे. १७ हजार ८४३ कोटी खर्च करून सुरू असलेल्या या पुलाचे काम चार टप्प्यात होणार आहे. २०१८ पासून सुरू असलेल्या ट्रान्स हार्बर लिंकचे काम कोरोनामुळे गेल्या एक वर्षापासून धीम्या गतीने सुरू आहे.