मुंबईत कोरोनाचे १३७२ नवे रुग्ण

शुक्रवारी ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी १३७२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५५ हजार ३५७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने

शुक्रवारी ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू


मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी १३७२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५५ हजार ३५७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २०४२ वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, शुक्रवारी मुंबईमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६५ जणांना दीर्घकाळ आजार होते.यामध्ये ६५ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे.मृतांमधील ६ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४६ जण हे ६० वर्षांवरील, तर ३८ जण हे ४० ते ६०  वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८०५  संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार ९८८ वर पोहचली आहे. तसेच९४३  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २५ हजार १५२ जणांना घरी सोडण्यात आले आहे,  अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.