मुंबईत १३८२ नवे रुग्ण  ; ४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गुरुवारी १३८२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८८२ वर पोहचला आहे. मुंबईतील

मुंबई : मुंबईत गुरुवारी १३८२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८८२ वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून गुरुवारी ही मुंबईमध्ये तब्बल १३८२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहचली आहे.१८ ते १९ मे दरम्यान केलेल्या १४२ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. 

मुंबईमध्ये ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८८२ वर पोचली आहे.मृत्यू झालेल्या ४१ जणांमधील २३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २४ पुरुष तर १७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघाचे वय ४० वर्षांखालील, १८ जण हे ६० वर्षांवरील, तर २१ जण हे ६० वर्षावरील आहेत. तर १७ रुग्ण ४०  ते ६० दरम्यानचे आहेत.

मुंबईत कोरोनाचे ७७७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २२ हजार ४८४ वर पोहचली आहे. तसेच २८५  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६७५१ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.