मुंबईत कोरोनाचे १३९५ नवे रुग्ण

रविवारी ७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई :मुंबईमध्ये रविवारी १३९५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५८ हजार १३५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

रविवारी ७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईमध्ये रविवारी  १३९५  नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५८ हजार १३५  वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २१९० वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारी  मुंबईमध्ये ७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ५९  जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ५५ पुरुष तर २४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४  जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४२ जण हे ६०  वर्षांवरील, तर ३३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७५८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजार ५३४ वर पोहचली आहे. तसेच १०३९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २६ हजार ९८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.तर बरे ज़ालेल्या रुग्णाचा दर ४६% असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.