udhav thackrey

राज्यात कोरोना कहर सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यात संपूर्ण टाळेबंदीसाठी सर्व समाज घटकांचे मन वळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून बैठकांचा धडाका लावला आहे. काल सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकी नंतर त्यांनी आज कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक केली. कोरोना स्थितीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यात लसीकरण आणि टाळेबंदी देखील चर्चा करण्यात आली अशी माहिती  सूत्रांनी दिली.

    मुंबई : राज्यात सुरूवातीला आठ दिवसांची टाळेबंदी येत्या दोन दिवसांत लागू करून त्यानंतर ती आणखी आठ दिवस वाढविण्याबाबत कोरोना कृतीदलाच्या तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिफारस केली आहे. येत्या दोन दिवसांत यबाबतची नियमावली तयार करून मुख्यमंत्री याबाबत घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.

    राज्यात कोरोना कहर सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यात संपूर्ण टाळेबंदीसाठी सर्व समाज घटकांचे मन वळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून बैठकांचा धडाका लावला आहे. काल सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकी नंतर त्यांनी आज कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक केली. कोरोना स्थितीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यात लसीकरण आणि टाळेबंदी देखील चर्चा करण्यात आली अशी माहिती  सूत्रांनी दिली.

    आठ दिवसांची दोन टप्प्यात कडक टाळेबंदी

    डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांची कडक टाळेबंदी हवी, असे मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडले आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय ओक, झहीर उदवाडिया लिलावती रुग्णालयाचे डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे केदार तोरस्कर, फोर्टीस रुग्णालयाचे डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक शिव रुग्णालयाचे डॉ. एन.डी. कर्णिक, पी.ए.के. रुग्णालयाचे डॉ. झहिर विरानी, केईएम रुग्णालयाचे डॉ. प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्समध्ये आहेत.

    कोरोनास्थिती हाताबाहेर

    सांयकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या बैठकीत सुरूवातीला आठ दिवसांच्या कठोर टाळेबंदी नंतर गरज पडल्यास आणखी आठ दिवस वाढ करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ठाकरे यानी केले. राज्यात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनास्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे त्यातच लसीकरण, चाचण्या आणि उपचार असा तिहेरी भार आल्याने आरोग्य सेवा यंत्रणा कोलमडून जाण्याची स्थिती आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यानी चिंता व्यक्त केली. सध्या रात्रीची संचारबंदी आणि विकेंड टाळेबंदीचा उपाय करण्यात येत असून त्यातून कोरोनाचा नवा स्टेन आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही असे मत  त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर विवीध तज्ज्ञांनी यास्थितीत राज्य सरकारने किमान १४ दिवसांची टाळेबंदी केल्यास स्थिती नियंत्रणात येवू शकेल अशी शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा

    कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला. त्यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते.

    दोन दिवसांत टाळेबंदीची घोषणा

    सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत नव्या टाळेबंदीच्या निर्बंधा बाबत मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची उच्चाधिकार समिती नियमावली तयार करेल आणि येत्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत टाळेबंदी आणि दुर्बल घटकांसाठी करायच्या उपाय योजनांबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या १४ किंवा १५ तारखेपासून राज्यात पंधरा दिवसांची टाळेबंदी कठोरपणे लागू केली जाण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली.