मुंबईत कोरोनाचे १४२१ नवे रुग्ण

रविवारी ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई :मुंबईमध्ये रविवारी १४२१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजार ५४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने

रविवारी ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये रविवारी १४२१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजार ५४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १६३६ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, रविवारी ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४२ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखाली होते. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर ३० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७४८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३६ हजार ३५९ वर पोहचली आहे. तसेच १२१८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २१ हजार १९६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.