मुंबईत कोरोनाचे १४३७ नवे रुग्ण

- मागील दोन दिवसात रुग्ण संख्येत वाढ ; शुक्रवारी ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढ ज़ाल्याचे दिसून येत

– मागील दोन दिवसात रुग्ण संख्येत वाढ ; शुक्रवारी  ३८  कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत   मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढ ज़ाल्याचे दिसून येत आहे, आठवडयाच्या सुरुवातीला रुग्ण संख्येत घसरण झाल्याचे समोर आले होते.वाढती रुग्ण संख्यावर नियंत्रण कसे मिळवायचा हा आरोग्य विभागा समोर प्रश्न निर्माण ज़ाला आहे.

 शुक्रवारी कोरोनाने ३८ जणाचा बळी घेतला आहे.शुक्रवारी मुंबईमध्ये १४३७ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३६ हजार ७१० वर पोहचली आहे.त्याचप्रमाणे ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११७३ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या ३८ जणांमधील २८ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २२  पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे.मृतांमधील  दोन जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. २०  जण हे ६० वर्षांवरील, तर१६  जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८३२  संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ३८६  वर पोहचली आहे. तसेच ७१५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १६, ००८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.