मुंबईत कोरोनाचे १४३८ नवे रुग्ण

गुरुवारी ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ज़ाल्याचे दिसून येत आहे, मागील दोन दिवस रुग्ण संख्येत घसरण ज़ाल्याचे समोरा आले. परंतु गुरुवारी

गुरुवारी ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ज़ाल्याचे दिसून येत आहे, मागील दोन दिवस रुग्ण संख्येत घसरण ज़ाल्याचे समोरा आले.  परंतु गुरुवारी पुन्हा  वाढ ज़ाल्याचे समोर आले आहे.

मागील दोन दिवस रुग्ण संख्येत घसरण ज़ाल्याने दिलासा मिळाला असला तरीही पुन्हा ज़ालेली वाढ डॉक्टरांमधे चिंता व्यक्त केली जात आहे.गुरुवारी कोरोनाने ३८ जणाचा बळी घेतला आहे.

गुरुवारी मुंबईमध्ये १४३८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार २७३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११३५ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या ३८ जणांमधील २४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १९  पुरुष तर १३ महिलांचा समावेश आहे.मृतांमधील  तीन जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. १२ जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८३९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २८ हजार ५५४  वर पोहचली आहे. तसेच ७६३  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९८१७ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.