विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्क्यांची कपात, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.

    मुंबई: खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याबाबत ठाकरे सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टानं राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारने १५ टक्के शुल्क कमी करावी असे आदेश दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते.

    कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच १५ टक्के फी माफीबद्दल लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचं समजलं जात आहे.

    खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, त्यामुळे या कालावधी पुरता फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशाद्वारे प्रस्तावित असल्याची माहिती आहे.

    कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.