ऑगस्टमध्ये १५ लाखांच्यावर लोकांचे रोजगार गेले, याला जबाबदार कोण? -तपासे

सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचं धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकुल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली आणि उद्योगधंद्याना जी चालना मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आणि त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

    मुंबई : सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून, सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे हा धक्कादायक आकडा आहे. तर ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र यांना केला आहे.

    सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचं धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकुल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली आणि उद्योगधंद्याना जी चालना मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आणि त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे. एकिकडे कोरोनाचे संकट आहे, देशात कोरोनाचा फटका सर्वं क्षेत्राला बसला आहे, अनेकांचे रोजगार गेले. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. आणि मोदी सरकार खासगीकरण करण्याच्या पाठीमागे लागले आहे, यातून सर्व महत्वाचे प्रोजेक्ट काही मोजक्या उद्योगपतीचा हाती मोदी देत आहेत असा आरोप सुद्धा महेश तपासे यांनी केलाय.

    दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं सांगणारं मोदींचं सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेच. शिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकली नाही ही वास्तवता समोर आली आहे असेही महेश तपासे म्हणाले.