राज्यात १५ हजार १६९ इतक्या नवीन रुग्णांची नोंद, तर २८५ रूग्णांचा मृत्यू

राज्यात बुधवार २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

  मुंबई: बुधवारी राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,७६,१८४ झाली आहे. आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१६,०१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान राज्यात बुधवार २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

  यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६८ ने वाढली आहे. हे २६८ मृत्यू, पुणे-६०, नागपूर-४५, अहमदनगर-२५, औरंगाबाद-२४, गडचिरोली-२१, भंडारा-१४, नांदेड-११, नाशिक-९, रत्नागिरी-७, गोंदिया-६, लातूर-५, ठाणे-५, कोल्हापूर-४, उस्मानाबाद-४, सांगली-४, वर्धा-४, बीड-३, पालघर-३, सातारा-३, सोलापूर-२, यवतमाळ-२, बुलढाणा-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जळगाव-१, जालना-१, परभणी-१ आणि रायगड-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७% एवढा आहे.

  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ९२३:

  मुंबईत दिवसभरात ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०७०४१ एवढी झाली आहे. तर ३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४८८० मृत्यूची नोंद करण्यात आली.