15-year-old girlfriend abducted in a speeding express 19-year-old boyfriend arrested

अटक आरोपी अजित विश्वकर्मा याचे मुंबईतील मानखुर्द परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला आणि मुलीला घेऊन महिला कुशीनगर एक्सप्रेसने गावी जाण्यास निघाली. हे माहीत पडताच अजितही कुशीनगर एक्सप्रेसने प्रवास करू लागला. दरम्यान, कल्याण स्थानक येण्यापूर्वी एक्सप्रेस थांबताच अजित अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळाला.

    कल्याण : आईसोबत गावी जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला कुशीनगर एक्सप्रेसमधून पळवणाऱ्या १९ वर्षीय प्रियकर अजित विश्वकर्मा याला अटक करण्यात आली. सदर कारवाई कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकीकरण शाखा पथक ३ ने केली. या आरोपीला पुढील कारवाईसाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    अटक आरोपी अजित विश्वकर्मा याचे मुंबईतील मानखुर्द परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला आणि मुलीला घेऊन महिला कुशीनगर एक्सप्रेसने गावी जाण्यास निघाली. हे माहीत पडताच अजितही कुशीनगर एक्सप्रेसने प्रवास करू लागला. दरम्यान, कल्याण स्थानक येण्यापूर्वी एक्सप्रेस थांबताच अजित अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळाला.

    एक्सप्रेस कल्याण स्थानकात येताच मुलगी बेपत्ता झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ चे पथकदेखील मुलीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान काही तांत्रिक माहितीचे विश्लेषण केला असता बेपत्ता मुलगी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत असल्याचे समजले. त्यानुसार कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने सागर्ली गावातून मुलीला व तिचा प्रियकर अजित विश्वकर्मा याला ताब्यात घेतले.

    या गुन्ह्याची उकल मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथक ३ चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, हवालदार दिवटे, पोलीस नाईक कर्डिले, पोलीस नाईक माने, महिला पोलीस अंमलदार पाटील आदी पथकाने केली.

    हे सुद्धा वाचा