sanjay raut nitishkumar

बिहारमध्ये आता तेजस्वी लाट आली आहे. तेजस्वी यादव यांना बिहारच्या जनतेने उत्तम साथ दिली आहे. जदयुचे प्रवक्ता, के.सी त्यागी म्हणतात, त्यांना कोरोनाचा फटका बसलाय. म्हणजे ते नागरिकांना सुविधा देण्यात सपशल अपयशी ठरे आहेत. ३० वर्षाच्या एका तरुणाने केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहेत.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुक (bihar assembly election 2020)  २०२०ची मतमोजणी सुरु आहे. बिहारच्या जनतेचा कौल तेजस्वी यादव यांना दिल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव (RJD Leader) यांना बिहारच्या जनतेची उत्तम साथ असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसत आहे. महागठबंधनने जोरदार मुसंडी मारली आहे. बिहारमध्ये एनडीए १२२ तर महाआघाडी १०४ जागांवर आहे. त्यामुळे या दोघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे वक्तव्य बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. संजय राऊत भाजपावर टोलवाटोलवी करत आहेत संजय राऊत यांनी नितीशकुमारांना ( Nitish Kumar)  टोला लगावला आहे की, बिहारमध्ये आता जंगलराज समाप्त होत आले. आणि मंगलराजला सुरुवात झाली आहे. असा टोला राऊतांनी लगावला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, बिहारमध्ये आता तेजस्वी लाट आली आहे. तेजस्वी यादव यांना बिहारच्या जनतेने उत्तम साथ दिली आहे. जदयुचे प्रवक्ता, के.सी त्यागी म्हणतात, त्यांना कोरोनाचा फटका बसलाय. म्हणजे ते नागरिकांना सुविधा देण्यात सपशल अपयशी ठरे आहेत. ३० वर्षाच्या एका तरुणाने केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये तेजस्वी लाट आले आहे. १५ वर्षांचे जंगलराज आता संपुष्टात येऊन मंगलराजचा प्रारंभ होणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बादशाह तो वक्त होता है…. इन्सान तो युं ही गुरुर करता हे, असा शायरी करत हिंदी भाषेत भाजपाला टोलावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.