15,511 रिक्त पदे भरणार; अर्थविभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. गट अ- 4417, गट ब- 8031, गट क- 3063 अशी एकूण 15511 पदे भरली जाणार आहेत

    मुंबई : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे.

    या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. गट अ- 4417, गट ब- 8031, गट क- 3063 अशी एकूण 15511 पदे भरली जाणार आहेत

    दरम्यान, आरक्षणानुसार ही पदे भरली जाणार आहेत.या निर्णयांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्याचे सांगत पवार यांनी सांगितले. या घोषणेमुळे एमपीएससी विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे. कोरोना स साथरोगामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या जागा भरल्या गेल्या नव्हता. पण, आता या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.