17 billion debt to Adani Group; Yet how did Gautam Adani become the second richest businessman in the country?

अदानी ग्रुपच्या कंपन्यां सध्या चांगल्याच तेजीत आहेत. कंपन्यांमधून चांगला नफा होत असल्याचे अदानी ग्रुप नफ्यात आहे. त्यांच्या शेअरचे भाव देखील चांगलेच वधारले आहेत. यामुळेच गुंतवणूकदार त्यांच्या कंपनीचे शेअर सोडण्यास इच्छुक नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई : अदानी ग्रुपवर १७ अब्ज डॉलरचं कर्ज आहे. असे असताना अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती (Adani Group property) बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती  ३२.४ अब्ज डॉलर म्हणजेच २.३ लाख कोटी इतकी आहे.

अदानी ग्रुपच्या कंपन्यां सध्या चांगल्याच तेजीत आहेत. कंपन्यांमधून चांगला नफा होत असल्याचे अदानी ग्रुप नफ्यात आहे. त्यांच्या शेअरचे भाव देखील चांगलेच वधारले आहेत. यामुळेच गुंतवणूकदार त्यांच्या कंपनीचे शेअर सोडण्यास इच्छुक नसल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अदानी ग्रुपचे शेअर बाजारात तेजीत

शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या मायनिंग, गॅस आणि पोर्ट्स यांसह अनेक कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अदानी एंटरप्रायजच्या शेअरने  ५.६० टक्क्यांनी उसळी घेतली. सोलार क्षेत्रातील ६ अब्ज डॉलर्सच्या व्यवहारानंतर अदानी ग्रुपच्या  ग्रीन एनर्जी शेअरची किंमत ६ पटीने वाढली.

अदानी ग्रुपची वेगवेगळ्या  क्षेत्रांमध्ये भरारी

अदानी ग्रुपने जगभरातील अनेक कंपन्यांसोबत करार केले असून अनेक कंपन्यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहे. यामुळे  कंपनीच्या डोक्यावर कर्ज असलं तरी पुढचे आणखी वर्ष तरी कंपनीच्या कारभारावर आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर याचा काहीच परिणाम होणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे.

कोरोना काळातही अदानी ग्रुपचा व्यवसाय तेजीत

ब्लूमबर्गच्या बिलियनेयर इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. अदानींच्या संपत्तीत यावर्षी २१.२ अब्ज डॉलर म्हणजेच १.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सलादेखील चांगली किंमत मिळाल्याने अदानी ग्रुपच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळली असताना अदानी ग्रुपचा व्यवसाय कोरोना काळातही तेजीत होता.

२० वर्षांपूर्वी  खंडणीसाठी झाले होतो अदानींचे अपहरण

२० वर्षांपूर्वी अदानी यांचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अदानी यांना ओलीस ठेवले होते. अशा अनेक संकटांचा सामना करत अदानी यांनी आपल्या व्यवसायावरील पकड कायम घट्ट ठेवली. अनेक अडचणींचा सामना करत ते एक यशस्वी उद्योजक बनले आहेत. कोरोना काळात अनेक बड्या कंपन्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही उतरती कळा आली. मात्र, कोरोना काळातही अदानी यांच्या व्यवसाय तेजीत होता.