Corona

राज्यात काल दिवसभरात एकूण १.९१,२५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज १५,७८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत ७.५५,८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ % एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण ३६३ मृत्यूंची नोंद झाली.

मुंबई : राज्यात सोमवारी १७.०६६ कोरोनाबाधित रुग्णांची भर (17,066 new patients in the last 24 hours in the state) पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,७७,३७४ झाली आहे. तर आज ३६३ रूग्णांच्या मृत्यूची (deaths ) नोंद झाली असून मृतांचा आकडा २९,८९४ वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात १५.७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान सोमवारी नोंद झालेल्या ३६३ मृत्यूंपैकी १८५ मृत्यू हे ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ११३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

राज्यात काल दिवसभरात एकूण १.९१,२५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज १५,७८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत ७.५५,८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ % एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण ३६३ मृत्यूंची नोंद झाली.त्यापैकी ठाणे परिमंडळ ७३ , पुणे ४४ ,नाशिक २८ , कोल्हापूर ६८,औरंगाबाद  ८, लातूर मंडळ १७,अकोला मंडळ १४,नागपूर ३ व इतर राज्य २ येथील मृत्यूचा समावेश आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५३,२१,१६६  नमुन्यांपैकी१०,७७,३७४  ( २०.२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,१२,१६० लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.