मुंबईत १७५१ नवे रुग्ण ; २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईत शुक्रवारी १७५१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २७ हजार ६८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९०९ वर पोहचला आहे. मुंबईतील

मुंबई :मुंबईत शुक्रवारी १७५१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २७ हजार ६८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९०९ वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शुक्रवारीही मुंबईमध्ये तब्बल १७५१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २७ हजार ६८ वर पोहचली आहे. 

१७ मे रोजी निदान झालेल्या २७६ चाचण्यांचा शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केल्याने त्यांचाही यात समावेश आहे.मुंबईमध्ये २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९०९ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २७ जणांमधील २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १८ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे.मृतांमधील एकाचे वय ४० वर्षांखालील, १३ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.मुंबईत कोरोनाचे ७८० संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार २६४ वर पोहचली आहे. तसेच ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७०८० जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.