vijay wadettiwar

मुंबईचा समावेश मात्र दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई, ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असणारी लोकल तूर्तास सुरु करण्यात येणार नाही, असेही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबई शहर, उपनगर आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश आहे.

    मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने, राज्यातील १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन उद्यापासून उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. राज्यात पाच टप्प्यातं अनलॉक करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ठाण्यासह १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी सर्व निर्बंध उठवण्यात येणार असून, दुकाने, मॉल, सरकारी आणि खासगी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही खुली करण्यात येणार आहे.